दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी मधील, भौतिकशास्त्र विभाग व इन्कूबेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(PM–USHA) अंतर्गत “विज्ञानातील नाविन्यपूर्ण आणि अद्भुत प्रयोगांची प्रात्यक्षिके” या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन केले. विज्ञानाची गोडी, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भगवान चक्रदेव यांनी विज्ञानातील अनेक प्रात्यक्षिके करून दाखविले व त्यातील विज्ञान विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी वैभववाडी तालुक्यातील विविध माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील ३८४ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहिले. विज्ञान विषयाला प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग उल्लेखनीय होता.