आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त डॉ. आर. एम. गुलदे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी भूषविले. या कार्यक्रमात हर्ष नकाशे याच्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.